इंदापूर:- कृषी पंतप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशातील शेती आणि शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागून प्रत्येकच राजकीय पक्षाने सत्ता मिळवली शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आहेत परंतु त्या संघटनांमध्ये मतभेद आहेत, खरेतर शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या कामामध्ये मतभेदांना स्थान नसायला हवे होते असो आजचा शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे,शेती व जोड धंदे तोट्याची झाले आहेत एका बाजूला शेतीमध्ये उत्पादन घेतले तर हमी भाव नाही शेतीमध्ये हमीभाव नाही म्हणून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुट पालन हे व्यवसाय बेभरवशाचे आहेत, दुधाला भाव नाही दूध शेतकऱ्यांचे मलई मात्र डेरी चालक खातात, आसे मत शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष,मा.नितीनदादा आरडे -पाटील याांनी व्यक्त केले,यावेेळी ते म्हणाले की, शेळी पालन कुकुटपालन ची तीच अवस्था कोंबड्या पाळाव्यात तर थेट शेतकऱ्याकडून कोणीही घेत नाही घ्यायला गेले तर
बाजारभावापेक्षा दोन रुपये कमीच किंमत अगदी भाजीपाला शेतामध्ये केला तर आठवडे बाजारात विकायला तर बाजारात आलेले पांढरपेशे दहा रुपयाची मेथीची पेंडी पाच रुपयाला मागतात तिकडे 699 रुपयाचा मोबाईल रिचार्ज करताना कधी कुठल्या कंपनीला म्हणत नाहीत ची 699 चा रिचार्ज सहाशे पाच रुपयाला करा पण शेतकरी म्हटलं की यांच्या व्यवहार ज्ञानाला उधाण येते व तरकारी मध्ये किती पैसे वाचवले हे आवर्जून सांगितले जाते आज डिझेल महाग झाले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीची मशागत ही महाग होते एकूणच शेती उत्पादनाच्या प्रक्रियेवर खूप मोठा गंभीर परिणाम डिझेलच्या महागाईमुळे होतो परंतु याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे दहा रुपयाचा कांदा वीस रुपये किलो झाला की गृहिणींचे बजेट बिघडते इथे 70 रुपयाचे पेट्रोल 100 रुपयाच्या पलीकडे गेले पण बजेट कुणाशीच बिघडत नाही उलट देशाचे बजेट सुधारते एकूणच व्यवस्थेमध्ये शेतकरी प्रचंड भरडला जात आहे या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण लढा उभारत आहोत साथ द्या, हात द्या असे मत शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष,मा.नितीनदादा आरडे -पाटील यांनी व्यक्त केले,
टिप्पण्या