शेतक-यांचा पुळका आसणारा आंदोलन कर्ता पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या दांड्याच्या भितीने गायब -संजय भैय्या सोनवणे
इंदापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांंना निवेदन देण्यात आले या वेळी संजय भैय्या सोनवणे, धनंजय तांबिले, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, (छाया-धनंजय कळमकर )
इंदापूर :- इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे दि. १६/०६/२०२१ रोजी इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार होते, ते गुन्हा दाखल होईल या भीतीने हजरच राहीले नाहीत,आसे नसून ते आंदोलन कर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांच्या दांडा आंदोलनाच्या भितीने आलेच नाहीत, आशी सामान्य जनतेत चर्चा आहे, आंदोलन कर्त्यांना इंदापूर तालुक्यातील शेतक-यांची एवढी काळजी होती, तर आंदोलन न करता कोणत्या बिळात लपून कुठे बसले आहेत, नौटंकी बहाद्दर, हे मात्र कळालेच नाही, आसे संजय भैय्या सोनवणे म्हणाले,
५० वर्षापासून २२ गावांचा पाण्याचा प्रश्न राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या माध्यमातून ५ टि.एम.सी. पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय मंजुर झाला होता. तो निर्णय सोलापूर जिल्हयातील लोकप्रतिनिधी व शेतकरी नेते एकत्रीत येवून हा शासन निर्णय रद्द करण्यास शासनाला भाग पाडले त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
आज पर्यंत इंदापूर तालुक्यातील जे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सोलापूर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील जमिनीचे वाटप करण्यात आले त्या जमिनी तेथील मुळ मालकांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कसू दिल्या नाहीत,आसे मत संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी निवेदनात व्यक्त केले आहे, या वेळी ते म्हणाले की, माझे या सोलापूर जिल्हयातील शेतकरी नेत्यांना आव्हान आहे कि आज पर्यंत लाभ शेञातील मिळालेल्या जमिनेचे जे खरेदीखत झाले ते पुनर्वसित शेतकरी यांचा जवाब इनकॅमेस व नार्को टेस्ट करून घ्या.
आमची कशी फसवणूक झाली ते समजेल व त्याचे उत्तर आता जे शेतकरी नेते इंदापुर तहसिल कचेरी समोर आमच्या हक्काचे पाणी रद्द करून आम्ही इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणी मुळवून देऊ हे नाटक करीत आहेत. हि नोटंकी आम्ही चालू देणार नाही व महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे १६ जून रोजी होत असलेले बेमुदत धरणे आंदोलन उधळून लावणार आहोत या दांडा आंदोलनात पीपल्स रिपब्त्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी व भीम सैनिक व शेतकरी सामील होणार आहेत. आमच्या हक्काची भाकरी आम्ही आमच्या ताक्तीवर मिळवणारच आहे आमची सहनशीलता संपली आहे आता मोर्चा नाही आता झेंडा नाही आता त्याच डेंडयाचा दांडाहातात घेऊन या शेंतकरी नेत्यांना
त्याचा जाब विचारणार आहोत. खर खरेच शेतकरी नेते असाल तर लाभ शेतातील जमिनीचे गॉड बंगाल काय आहे का त्यात तुम्ही सामील आहात? हे आम्हास इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यास सांगावे व आज पर्यंत सोलापूर जिल्यात लाभ क्षेत्रातील मिळालेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करून इंदापूर तालुक्यातील पुनर्रवशित शेतकऱ्यांना वहीवाटण्यास ताबा देण्यात यावा. आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी रद्द करणाऱ्या या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे दि. १६/०६/२०२१ रोजी इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी व भीम सैनिक व शेतकरी उधळून लावणार होते परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितले की, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन इंदापूर तहसील कचेरी समोर होऊ देणार नाही परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे आपण आपले दांडा आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली. होती परंतु, तरीही इंदापूर नगरपालिका परिसरातून पुणे सोलापूर हायवे वरून संजय भैय्या सोनवणे यांचा दांडा मोर्चा, इंदापूर पोलिस स्टेशन कडे नेहण्यात आला,या वेळी शेतकरी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते, संजय भैय्या सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले, व आंदोलन स्थगित करण्यात आले याचे निवेदन पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांंना देण्यात आले,
या वेळी सोनवणे म्हणाले की दि.१६/०६/२०२१ रोजीचे इंदापूर तहसील कचेरी समोर होणारे दांडा आंदोलन स्थगित करीत आहोत. आशी माहिती संजय भैय्या सोनवणे यांनी दिली, या वेळी धनंजय तांबिले,विजय सोनवणे,गणेश पाटील,सुभाष डरंगे, सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या