इंदापूर:- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा 51 वा वाढदिवस इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला इंदापूर शहरातील फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते छोटे-मोठे व्यापारी तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हाताने काँग्रेसच्या पदअधिकाऱ्यांनी वीणा मास्क फिरणार्यांना मास्क घालून मास्क चे महत्व पटवून देऊन गांधीगिरी केली. यावेळी 501 पक्षाचे चिन्ह असलेले मास्क वाटप करण्यात आली.
तसेच इंदापूर शहरातील इरिगेशन कॉलनी येते घरोघरी जांभूळ या फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली. त्याच कॉलनीत असलेले गणेश मंदिर परिसरात विविध फळांची व सावली देणारी रोपे लावण्यात आली.
यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, रोजगारी हटवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी, आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते राहुलजींना सत्तेत आणण्याचा निर्धार करत आहे आजचा दिवस हा संकल्प दिन म्हणून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी साजरा करत आहे.
यावेळी इंदापूर शहर अध्यक्ष चमन भाई बागवान,महिला तालुका अध्यक्ष सीमा कल्याणकर, जिल्हा सरचिटणीस जकिर भाई काजी, भगवानराव फासगे, महादेव लोंढे, निवास शेळके, दत्तात्रय देवकर, मिलिंद साबळे, सुफियान खान जमादार, संदीप शिंदे, समीर शेख, तुषार चिंचकर आधी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या