निमसाखर रस्ता बनला मृत्यू चा सापळा,रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे-शेखर पानसरे ग्रामपंचायत सदस्य
इंदापूर:- पुणे जिल्हा परिषद, सदस्य यांनी जनतेच्या हितासाठी या रस्त्याचे काम मंजूर केले,पण सबंधीत ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केले आहे, या रस्त्याचे काम होऊन एक वर्ष सुध्दा उलटले नाही,रस्ता खड्यात की खड्डा रस्तात हेच कळत नाही, आशी माहिती शेखर पानसरे ग्रामपंचायत सदस्य निमसाखर यांनी दिली, या वेळी ते म्हणाले की, हा रस्ता पुर्ण पणे उखडला आहे, त्या मुळे रात्री अपरात्री कोणी आजारी पडला तर दवाखान्यात जाण्या आगोदरच त्याला मरण यातना सहन कराव्या लागतात, या रस्तावर अनेक अपघात ही घडले आहेत, त्या मध्ये अनेकजन अपंग झाले आहेत, याला जबाबदार कोण?,
बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येणारा,निमसाखर ते पागळेवस्ती रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असुन रस्त्यांचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्या रत्त्यावरून निमसाखर येथून इंदापुर व बारामती येथे जाणा-या लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे,
या रस्त्यावर कारंडेवस्ती, पानसरेवस्ती शेखवस्ती, शिरसटवाडी, पागळेवस्ती आदी परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायिक सातत्याने प्रवास करत असतात . मात्र सदर रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने त्या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे.आशा आशयाचे निवेदन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे शेखर संतोष पानसरे ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले आहे, त्या निवेदनात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालून रस्त्या करावा आसाही उल्लेख केला आहे, हा रस्ता वरदान ठरण्या पेक्षा मृत्यू चा सापळा बनला आहे,
टिप्पण्या