करोनाच्या तिसऱ्या लाटेत अधिक सतर्क व्हा
खासदार सुप्रिया सुळे : इंदापूर येथे आढावा बैठकीत आवाहन
इंदापूरः-करोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले असून, तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. तिसरी लाट दूर ठेवायची असेल तर, नागरिकांनी सतर्क राहून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खामदार सुप्रिया सुळे यांनी केले. इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात खासदार सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुबारी (दि. १७) करोना नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्वादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,वसंत आरडे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ. सुहास शेळके, डॉ. प्रशांत महाजन, पोलोस निरीक्षक
धन्यकुमार गोडसे, जीवन माने, बिरप्पा लातुरे, दिलीप पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा परिषद सदस्य अभिजात भैय्या तांबिले, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महारुद्र पाटील,रमेश पाटील, राजेशजी शिंदे माजी उपनगराध्यक्ष इंदापूर, नगरसेवक पोपट शिंदे, यांसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बेठकीत खासदार सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील करोनास्थितीचा सर्व आढावा जाणून घेतला, उपाययोजनांबद्दल माहिती घेतली. यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले, करोना कालावधीत इंदापूर, वालचंदनगर आणि भिगवण या तोनही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी उत्तम कर्तव्य बजावले.
टिप्पण्या