इंदापूर :बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सराफवाडी ता. इंदापूर याठिकाणी (दि. ११ ) रोजी बहुजन समाजाच्या विकासाकरिता परिषदेची आढावा बैठक पार पडली.
बहुजन परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर, सरचिटणीस विजय गायकवाड, खजिनदार भगवान पासगे, तालुकाध्यक्ष अनिल मोहिते, तालुका उपाध्यक्ष राजू गायकवाड, संजय कुचेकर, सुनिल आरडे, बिजू मिसाळ, आझाद मुलाणी, सुधीर लोंढे, बाळासो मिसाळ, कायदेशीर सल्लागार अॅड. नारायण ढावरे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये तालुक्यामधील सर्व गावातून समाज बांधवांची जनगणना करणे व त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेणे व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजातील नव युवक-युवतींकरीता रोजगार निर्मिती करणे, तालुक्यातील प्रत्येक गावोवावी परिषदेची शाखा स्थापन करुन संघटनात्मक बांधणी करणे, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बहुजन परिषदेच्या मिडीया प्रमुख पदी दिपक खिलारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरम्यान बहुजन परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे बहुजन परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या