वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे येत्या २ नोव्हेंबर रोजी भारतीय पत्रकार संघ सातारा विभागाकडून परिसंवाद तसेच पदग्रहण व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी दिली. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांसह संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाळासाहेब सोळसकर शिरुपराजे खरडेकर शिवसेनेचे चंद्रकांत जाधव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड युवा उद्योजक सचिनजी यादव अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसाद जोशी डॉ.सचिन बेडके सत्कार मूर्ती जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यावेळी फलटणच्या मारवाड पेठेतील नवलबाई मंगल कार्यालयात २ नोव्हेंबर रोजी साय.४ च्या दरम्यान पत्रकार संघाच्या विविध कार्यक्रमांना सुरवात केली जाणार असून सर्वप्रथम परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योज...
SHIVSRUSTHI NEWS