वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे येत्या २ नोव्हेंबर रोजी भारतीय पत्रकार संघ सातारा विभागाकडून परिसंवाद तसेच पदग्रहण व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांसह संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाळासाहेब सोळसकर शिरुपराजे खरडेकर शिवसेनेचे चंद्रकांत जाधव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड युवा उद्योजक सचिनजी यादव अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसाद जोशी डॉ.सचिन बेडके सत्कार मूर्ती जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
यावेळी फलटणच्या मारवाड पेठेतील नवलबाई मंगल कार्यालयात २ नोव्हेंबर रोजी साय.४ च्या दरम्यान पत्रकार संघाच्या विविध कार्यक्रमांना सुरवात केली जाणार असून सर्वप्रथम परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योजक सचिनजी यादव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तर दुसऱ्या सत्रात पदग्रहण सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते केले जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन ( हरियाणा ) हे असणार आहेत .तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष एम.एस.शेख कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ संघटक अनिलजी सोनावणे लीगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे पाटील पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेश गणगे पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख महिला विभागाच्या आरती बाबर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार लतीफ नदाफ आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
टिप्पण्या