मुख्य सामग्रीवर वगळा

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमधील भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 120 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
 प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते
 *ही स्पर्धा दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेली आहे*
*स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.*
* *स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली होती* त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
*लहान गट* इयत्ता पहिली ते चौथी 

*प्रथम क्रमांक*-  भक्ती प्रवीण वाळुंजकर-प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी.*1001रू,JBVP चषक, प्रमाणपत्र*
*द्वितीय क्रमांक*-दूर्वा अमरदीप गवळी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुगाईवाडी सातारा *701रु JBVP चषक, प्रमाणपत्र* 
*तृतीय क्रमांक*-सार्थक दिलीपकुमार कुलकर्णी-अण्णासाहेब कल्याणी प्रायमरी स्कूल सातारा.*501रू JBVP चषक,प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1) देवांश लखन पाथरकर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखेवाडी *301रु,प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 2) काव्या नवनाथ माने-विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी *301रू, प्रमाणपत्र*


*मध्यम गट* इयत्ता पाचवी ते सातवी 
*प्रथम क्रमांक*-  साक्षी संजय जगताप-नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे.*3001रू,JBVP चषक, प्रमाणपत्र*
*द्वितीय क्रमांक*-  यशोधरा अमर चंदनशिवे- गुरुकुल विद्या मंदिर गोखळी. *2001रु, JBVP चषक, प्रमाणपत्र*
*तृतीय क्रमांक* - ज्योतिरादित्य गणेश जाधव देशमुख -प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी *1001रू JBVP चषक, प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक*  -  शिवराज रामचंद्र राजगुडे- हनुमान हायस्कूल व जुनिअर कॉलेज तांदुळवाडी *501रू व प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक*-  गाथा ज्ञानेश्वर मिले
*501रू व प्रमाणपत्र*

*मोठा गट* इयत्ता आठवी ते बारावी
*प्रथम क्रमांक*  ज्ञानेश्वरी सुशांत इंगवले- गुरुकुल विद्यामंदिर गोखळी *5001रु JBVP चषक, प्रमाणपत्र*
*द्वितीय क्रमांक*  संस्कृती संजय जगताप-नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे *3001रु , JBVP चषक व प्रमाणपत्र*
*तृतीय क्रमांक*  यशराज आप्पा हेगडे - यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा. *1001रू JBVP चषक व प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 
1) ज्ञानेश्वरी ब्रह्मदेव खाडे -विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी 
*501रु प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक*
* 2) जागृती भीमराव राजगुडे-हनुमान हायस्कूल व जुनिअर कॉलेज तांदुळवाडी *501रु प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक*
* 3) तनिष्का दीपक गुळवे-प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी
*501रू व प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 

वरील विद्यार्थ्यांना JBVP चषक,रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेचे पारदर्शकपणे परीक्षण करण्यासाठी खालील प्रमाणे परीक्षक लाभले होते. 
विठ्ठल नामदेव साळुंखे,राहुल रोहिदास निर्मळ, शशिकांत श्रीपाद तेरखेडकर,  धनाजी तानाजी जगताप इत्यादी परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या  वक्तृत्वाचे पारदर्शकपणे परीक्षण केले , वक्त्याला योग्य तो न्याय दिला. वरील सर्व परीक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, JBVP सन्मानचिन्ह, मानधन देऊन सन्मान करण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे प्रास्ताविक विद्यानिकेतन कॉलेज चे प्राचार्य  गणेश पवार यांनी केले. 
बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे  मुख्य सल्लागार प्रदीप गुरव यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना व पालकांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की,विद्यार्थी दशेपासूनच वक्ता घडत असतो विद्यार्थ्यांच्या शारीरिक, विकासाबरोबर मानसिक, बौद्धिक विकास घडावा म्हणून म्हणूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या व सहभागी विद्यार्थ्यांना खचून न जाता अपयशला जिद्दीने सामोरे जावे असे सांगितले.
ज्यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले, त्या संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, भाषणातून आपण  चांगले काय आहे हे शिकत असतो, 
*वाचाल तर वाचाल* चिंतन केले, चांगल्या वाचनाची गोडी निर्माण झाली तरच उत्तम वक्ता घडू शकतो असा मोलाचा सल्ला दिला.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव  हर्षवर्धन खाडे, 
मुख्य सल्लागार  प्रदीप गुरव, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  गणेश पवार, इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर, सहभागी स्पर्धक, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...