इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील सरडे वस्ती येथे रस्त्याचे उद्घाटन सरडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते समाज सेवक नानासाहेब सरडे यांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे नागरीसुविधा योजना अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले. सरडेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मोहन (बापू) सरडे, उद्योजक रघुनाथ (आण्णा) जमदाडे, यांच्या हस्ते फित कापून नागरिकांना रस्ता खुला करण्यात आला.
उद्धाटन वेळी आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती.उद्धाटन वेळी मधुकर भाऊ जमदाडे, मोहन भाऊ जामदार, नानासाहेब सरडे (समाजसेवक) बाळासाहेब जाधव, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हनुमंत नाना जमदाडे ग्रामपंचायत सदस्य गोकुळ तात्या कोकरे,प्रल्हाद बापू सरडे, कुलदीप तोबरे, नामदेव तोबरे, संतोष दादा सरडे, महावीर आबा सरडे, बापूराव जमदाडे,विजय तोबरे, संदिप जमदाडे, मंगेश सरडे, दादासाहेब सरडे, अभिजित सरडे, सचिन सरडे, इंजिनीयर शहाजीराजे तोबरे, इंजिनीयर शुभम पिंपरे, आप्पासाहेब सरडे, आलेल्या सर्व पाहुणे व मित्र परिवार यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभ वेळी विठ्ठल महाडिक यांनी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या सहकार्याने सदैव सर्व सामान्य लोकांनसाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले.सर्वांचे आभार जेष्ठ समाजसेवक नानासाहेब सरडे यांनी मानले.
टिप्पण्या