इंदापूर;- माढा तालुक्यातील दारफळ, बरडवस्ती, राहुलनगर, (सुलतानपूर)या गावांना सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठा फटका बसला आहे. या पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पतंजली योग समिती, राष्ट्र सेवा दल, इंदापूर नागरी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मदतीचे वाटप करण्यात आले.
महापुरामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. अशा कठीण प्रसंगात शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत जीवनावश्यक साहित्य गोळा केले. या माध्यमातून २५० किट्स वाटप करण्यात आले. यात ब्लँकेट, साड्या, कपडे यांसह विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचाही समावेश होता.
या मदत कार्यात नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे, बाळासाहेब क्षिरसागर, हामिद आतार; राष्ट्र सेवा दलाचे रमेश शिंदे, संदिपान कडवळे; पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी गाडगे, रविंद्र परबत, अशोक अनपट, डॉ. रविंद्र काळे, प्रशांत गिड्डे, गणेश दरंगे, किसन पवार, देवराव मते, चंद्रकांत देवकर,ज्ञानेश्वर घोगरे, सायराभाभी आतार आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्थांनी केलेली ही मदत पूरग्रस्तांसाठी दिलासा ठरली. सामूहिक प्रयत्नांमुळे मानवतेचा संदेश अधोरेखित झाला असून पूरग्रस्तांना मोठा आधार मिळाला आहे.
टिप्पण्या