इंदापूर, सणाच्या उत्साहात स्वतःच्या आनंदाबरोबर इतरांच्या चेहऱ्यावरही हसू उमटविण्याचा प्रयत्न करणं, हीच खरी दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. याच भावनेतून इंदापूर शहरातील श्रावण बाळ अनाथ आश्रम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनाथ बालकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला. समाजातील वंचित घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.आसे मत महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर यांनी व्यक्त केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शहराध्यक्ष ॲड. इनायातअली काझी, तालुका महिला अध्यक्षा छाया पडसळकर, तसेच राजीव करडे, गणेश देवकर, अमोल मुळे, समद सय्यद, आप्पासाहेब गायकवाड, विकास खिलारे, अक्षय कोकाटे, केशव भापकर, दादा थोरात, भारत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मुलांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. बालकांच्या निरागस हास्याने वातावरण भावविव्हलित झाले.
या उपक्रमाबाबत महारुद्र पाटील यांनी सांगितले की, “श्रावण बाळ अनाथ आश्रमातील बालकांसोबत दिवाळी साजरी करणं म्हणजे माणुसकीचा खरा उत्सव आहे. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविणे हीच खरी दिवाळी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे समाजात प्रेम, ऐक्य आणि संवेदनशीलतेचा दीप उजळला. गोरगरीब, दीन व बिकट परिस्थिती आसणा-या अनेक लोकांना दीपावलीभेट देऊन मदतीचा हात दिला, जनसामान्यांचा नेता महारूद्र पाटील आशी सामान्य जनतेत चर्चा आहे,
टिप्पण्या