स्थानिक गट व गणातील ग्रामस्थांचा आयात उमेदवाराला प्रचंड विरोध.
इंदापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असुन. तालुक्यातील पुढाऱ्यांनी स्वताच्या बगलबच्यांच्या कल्याणासाठी गण व गट निर्माण केले. असले तरी गण व गटातील आरक्षणा मुळे पेच निर्माण झाला आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यातून आपल्या गण व गटात संधी मिळत नाही. म्हणून दुसऱ्याच्या गण आणी गटात उभारायचे, गाव पुढाऱ्यांचा मनसुबा आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा डाव आहे. पण गण व गटातील नागरिकांचा प्रचंड विरोध असुन, आपल्या गण गटात आपली सोय करावी. आम्ही दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलायला कुणाचे बांधिल नाही. अशी लोकांत चर्चा आहे.नेमका कुठला पक्ष आयात उमेदवार देतोय, त्या पक्षाला जबर किंमत मोजावी लागणार.अन्यथा आम्ही विरोधी गटाला आतुन मदत करू, आयात उमेदवारांची चांगलीच जिरवू असा लोकांन मध्ये सुर आहे.त्यामुळे मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी पंचायत होणार आहे. खोबरे तिकडे चांगभले म्हणणार्यांची काय अवस्था होईल.हा येणारा काळच ठरवेल.त्यामुळे तालुक्यातील नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांनी किती वेळा विचार करायचा त्यांनीच ठरवायचे.
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आयात उमेदवार देण्यासारखी परिस्थिती नसुन,प्रत्येक गावात पक्षासाठी तन मन धनाने झटणारे बरेच आहेत.त्यांचा हि पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे.दिवसा हिकडे रात्री तिकडे असले महाभाग जवळ करण्यापेक्षा पक्षाशी प्रमाणीक व निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट देऊन त्यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करावी.
अशी गावा गावात चर्चा आहे.नाही तर नेत्यांना मोठी किम्मत मोजावी लागेल हे मात्र त्रिवार सत्य.
टिप्पण्या