एकीकडे दिवाळी साजरी होत असताना पुरंदर हवेलीतील मुस्लिम समाजासह इतर समाजातील निराधार तसेच गरीब व गरजू कुटूंबातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा , त्यांचीही दिवाळी गोड व्हावी याउद्देशाने गेली १८ वर्षांपासून वंचित घटकांना फराळ वाटप करणाऱ्या ग्रामीण संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जेष्ठ विधितज्ञ विजय भालेराव यांनी व्यक्त केले.
वाल्हे (ता. पुरंदर ) येथील मुस्लिम बांधवांना माजी आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्थेच्या वतीने दीपावलीनिमित्त फराळाचे वाटप विजय भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भालेराव पुढे म्हणाले, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप यांनी परंपरेनुसार पुरंदर हवेलीतील मुस्लिम समाजासह कुंभारवळण येथील सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदनात तसेच दुःखद घटना घडलेल्या आणि इतर गरीब कुटुंबापर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचवविण्याचे काम सुरू केल्याने जवळपास साडेतीन हजार कुटुंबाची दिवाळी गोड होणार आहे.तर संस्थेचे सदस्य मोहन शिंदे यांसह मोबीन बागवान यांनी फराळ वाटपाचे उत्तम नियोजन केले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी मौलाना मुनीर शेख अमर तांबोळी चांद शेख आयुब इनामदार शौकत शेख समीर आतार हनीफ शेख राजू इनामदार असलम नदाफ अलतमश तांबोळी अरबाज नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या