इंदापूर तालुक्यातील शहा येथे अश्विन शुध्द द्वादशीला संत बाळु मामा यांचा १३४ वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी १०ते१२ ह.भ.प. लालचंद महाराज चोपडे यांचे किर्तन झाले.१२.१५ बाळु मामा देवस्थान शहा गावचे पुजारी वैजनाथ महाराज कोळी यांनी आरती केली.
संत बाळु मामा एक संत होते.
ज्यांनी संसारात राहून संत पद प्राप्त केले.
त्यांना निस्सीम ईश्वर भक्त आणि संसारी संत म्हणून ओळखले जाते.
नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
किर्तन व आरतीसाठी शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या