वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक कार्यातही अग्रगण्य असणाऱ्या भारतीय पत्रकार संघाकडून यंदा गरीब कुटुंबातील सदस्यांना दिवाळीचा फराळ घरपोच देण्यात आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटताना पहावयास मिळाल्या आहेत.
यावेळी भारतीय पत्रकार संघाच्या बारामतीसह पुणे शहर विभागाकडून फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.या आनंददायी उपक्रमामुळे भारतीय पत्रकार संघाला समाजात मानाचे स्थान मिळाले असल्याची भावना पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष रमेश ( मामा ) गणगे पाटील यांनी व्यक्त केली.
भारतीय पत्रकार संघाकडून यापूर्वी आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत .परंतु यावर्षी दीपावली निमित्त गरीब कुटुंबातील सदस्यांना फराळ वाटप करण्याचा निर्णय पुरंदर मधील निरा - शिवतक्रार ग्रामपंचायत कार्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता .
या बैठकीत भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बारामती तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली या स्तुत्य उपक्रमाला सुरवातही करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख तसेच सचिव काशिनाथ पिंगळे यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले तर बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष मोहम्मद शेख कार्याध्यक्ष विनोद गोलांडे खजिनदार सोमनाथ लोणकर संघटक फिरोज भालदार ज्येष्ठ पत्रकार सुभाष जेधे तसेच शौकत शेख प्रेस फोटोग्राफर जितेंद्र काकडे आदी पदाधिकाऱ्यांनी बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध गावांमधील गरीब कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना घरपोच दिवाळी फराळाचे वाटप केले. यावेळी भारतीय पत्रकार संघाकडून मिळालेल्या दिवाळीच्या फराळाने अनेकांच्या कुटूंबात जणू आनंदाचा वर्षाव झाला असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
टिप्पण्या