वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ हडपसर येथील आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सुकलवाडी (ता.पुरंदर ) येथे एक दिवशीय ग्राम सर्वेक्षण शिबिर राबविण्यात आले.
या शिबिराचा शुभारंभ विद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मराठवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण गावामध्ये प्रभातफेरी काढत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन करण्यात आला. तसेच गावच्या शेतातील माती परीक्षण तसेच ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनी शेतीविषयी माहिती देखील घेतली.तसेच येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले .
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव एल.एम.पवार डॉ.संगीता साळवे डॉ.विलासजी आढाव सविता कुलकर्णी प्रा.ऋषिकेश मोरे प्रा.नरसिंह पावडे, प्रा.अपूर्वा बनकर सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार उपसरपंच नितीन गावडे यांसह धनंजय पवार राहुल यादव साईनाथ चव्हाण ह.भ.प.माणिक महाराज पवार नारायण पवार मनोज घाटे अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या