इंदापूर शहरात मुस्लिम को.ऑप.बँकेची स्थापना करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री प्रदीप गारटकर* यांनी केली आहे
इंदापूर शहर हे झपाट्याने विकास करत असून या शहरात मुस्लिम समाजाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी मुस्लिम को ऑप. बँकेची शाखेची स्थापना करण्यात यावी इंदापूर शहरातील मुस्लिम समाज छोटे मोठे व्यवसाय करत असून त्यांची आर्थिक उलाढाल ही चांगल्या प्रमाणावर आहे जेणे करून बँकेलाही चांगला व्यवसाय मिळेल असेही त्यांनी सांगितले.
बारामती येथे अल्ताफ हाजी हैदर भाई सय्यद एकता ग्रुप बारामती यांच्यावतीने बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री तनवीर पी ए इनामदार व उपाध्यक्ष ॲड. आयुब शेख यांचा सत्कार आमदार इद्रिस नायकवडी व जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी इंदापूर शहरातील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांची असलेली मागणी श्री. गारटकर यांनी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळासमोर ठेवली या मागणीला त्यांनी तातडीने होकार देऊन शाखा सुरू करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आला
टिप्पण्या