ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा महत्त्वाची असून त्यासाठी "उठा जागे व्हा ,आणि ध्येय गाठेपर्यंत प्रयत्न थांबू नका"; असा महत्वपूर्ण संदेश नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिला .
वाल्हे (ता पुरंदर )येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात डॉ. निलेश शहा यांच्या संकल्पनेतून आदर्श सामाजिक फाउंडेशन ,नवदिशा फाउंडेशन व महर्षी वाल्मीकी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई येथील सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर सिद्राम भुजबळ यांच्यावर आधारित " मी कसा घडलो" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त मयूर भुजबळ हे बोलत होते.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी सतत कार्यरत असले पाहिजे.ज्या गोष्टीमुळे ध्येय गाठण्यात अडचणी येतील अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत,विशेषतः सोशल मिडियाचा चुकीचा वापर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात टाळायलाच हवा,यामध्ये विनाकारण वेळ वाया घालवू नका,आपले छंद आवड जपा तसेच अभ्यासक्रमासह शारीरिक कसरतींना देखील प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. पूर्वी स्पर्धा परीक्षा म्हटलं की, एमपीएससी साठी पुणे आणि यूपीएससी साठी दिल्ली या ठिकाणी अभ्यास केला जायचा. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळायचं.आता मात्र सोशल मीडियाचा जमाना आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून देखील मार्गदर्शन मिळू शकते.स्पर्धा परीक्षा देत असताना पहिले वर्ष हे सर्व समजून घेण्यात जातं आणि दुसऱ्या वर्षापासून विद्यार्थी अभ्यासाला लागतो.स्पर्धा परीक्षांमध्ये लक्ष देऊन तुम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये तुम्हाला सहज यश मिळू शकत,असेही मत पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे,वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड,वागदरवाडी सरपंच सुनील पवार,सुकलवाडी सरपंच संदेश पवार,तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ,पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप,माजी कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ,दौंडजचे माजी सरपंच दामोदर कदम,माजी तंटामुक्ती अध्यक्ष समदास भुजबळ,उपसरपंच सम्राज्ञी लंबाते,तसेच मयुरी भुजबळ,मांडकीचे पोलीस पाटील श्रीतेज जगताप बाळासाहेब भुजबळ सागर भुजबळ,उद्योजक अमोल कदम आदर्श सामाजिक फाऊंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र भुजबळ,
नवदिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पांडकर, सचिव दादासाहेब राऊत, तुषार भुजबळ, सुरेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश निगडे यांनी केले.
तर सूत्रसंचालन शैला गवारी तसेच उपस्थितांचे आभार माजी पंचायत समितीचे सभापती गिरीश पवार व दादासाहेब राऊत यांनी मानले.
टिप्पण्या