इंदापूर:- प्रा भास्कर गटकुळ(इंदापूर) यांचे सुपुत्र चि पृथ्वीराज आणि कमलाकर गायकवाड पाटील (उमरगा) यांची कन्या अनघा गायकवाड पाटील यांचे लग्न जमविताना सुपारीच्या झाडाचे रोप भेट देऊन सुपारी फोडण्याचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी श्री व्यंकटराव गायकवाड पाटील,सेवानिवृत मुख्य सचिव,जलसंपदा महाराष्ट्र राज्य,भाजपचे माजी खासदार,प्रा. रवींद्र गायकवाड पाटील, प्रा विलासराव कदम,शिवाजीराव पाटील,अँड मनोहर चौधरी, अरविंदतात्या वाघ, डॉ महेश जगताप, सूर्यकांत भोरे, अंकुश पाडुळे,ॲड. जालिंदर बसाळे, नितीन पटेल,शिवाजी कापसे,यशवंत शितोळे, सीताराम जाधव, प्रा रविराज थोरात, अश्विनी थोरात, पंडित नलवडे, युवाउदयोजक अभिजित चव्हाण, पुणे रोटरी क्लब अध्यक्ष गोविंद जगदाळे, प्रा चंद्रशेखर लावंड मान्यवर उपस्थित होते.
सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा वधू आणि वर यांच्या दोन घराण्याचा नाते जोडणारा कार्यक्रम असून दोन घराण्यातील नात्याची ओळख आणि प्रेम वृद्धींगत होते अशा कार्यक्रमात प्रा. भास्कर गटकुळ आणि प्रा.जयश्री गटकुळ यांनी सर्व नातेवाईकांना पर्यावरण जागृतीसाठी सुपारी झाडाची रोप भेट म्हणून देत सामाजिक बांधिलकी जपली याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पर्यावरणाचे रक्षण करताना सुपारी फोडण्याचा कार्यक्रम अंतर्गत सुपारीची झाडे भेट देताना सामाजिक कार्याचा वारसा जपण्याचा स्तुत्य उपक्रम आहे असे मत भाजपचे माजी खासदार रवींद्र गायकवाड पाटील यांनी व्यक्त केले.शिवाजी गटकुळ, विश्वराज गटकुळ आणि गटकुळ परिवारच्या सर्व सदस्यांनी गुलाबपुष्प, शाल, टोपी, नारळ देऊन सर्व पाहुण्याचे स्वागत केले.
टिप्पण्या