इंदापूर;- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मराठवाडा, सोलापूर या भागातील संगोबा,बोरगाव त्याचबरोबर देऊळगाव या ठिकाणच्या पूरग्रस्त कुटुंबियांसाठी त्यांचा दसरा दिवाळी गोड होण्यासाठी पतंजली योग परिवाराचे अध्यक्ष मा श्री दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली व परिवारातील सर्व पुरुष व महिला साधक यांच्या सहकार्यातून व स्वच्छेने देणगी एकत्रित करून जमा झालेल्या देणगी मधून त्यांच्यासाठी जीवनाशक वस्तूंचे किट, साड्या, ब्लॅंकेट, सतरंजी, युवांसाठी पँन्टी व इतर कपडे, शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, कंपास, पेन व इतर साहित्य शेलेय मुलांसाठी तांदूळ इत्यादी गोष्टींचा वितरण प्रत्यक्ष वस्ती/ गावामध्ये जाऊन प्रत्येक कुटुंबाला करण्यात आले. खरंच तिथली परिस्थिती पाहिली तर खूप भयावह होऊन बसली आहे तरीसुद्धा माणुसकीच्या धर्म पाळून आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे पतंजली परिवार हा आरोग्याबरोबर सर्वांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहत असतो, अशाप्रसंगी सर्वच परिवारातील बंधू भगिनी नेहमीच सहकार्य करीत असतात. पूरग्रस्त बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना संकटांमधून बाहेर पडण्याचे बळ मिळो त्यांनी खचून न जाता या आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना एकोप्याने धीराने करावा असे मनोगत श्री विलासराव गाढवे यांनी किट वितरण प्रसंगी केले
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या