विकास कामांच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या पुरंदर तालुक्यातील सुकलवाडीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली भोसले तसेच रणगडे परिवाराच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला माजी जिल्हाधिकारी शिवलिंग गणपत भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले परिवाराच्या वतीने १५ गुंठे जागा बक्षिसपत्र स्वरूपात देण्यात आली होती. त्या जागेवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन प्रताप भोसले कमल भोसले सुवर्णा राणगडे निखिल राणगडे आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे यांसह विराज काकडे वामनराव जगताप माजी सरपंच दत्तात्रय पवार तसेच मोहन पवार सुनील पवार अमोल खवले महादेव चव्हाण सतीश सूर्यवंशी मोहन जगताप संतोष निगडे नितीन गावडे रणसिंग पवार अमित पवार उर्मिला पवार वैजंता दाते अश्विनी चव्हाण तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र चिकणी यांसह साईनाथ चव्हाण संध्या पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या