इंदापूर:-हरवलेले पैसे, मोबाईल,सोने, बँग, कागदपत्रे, शक्यतो परत मिळत नाहीत.पण ते परत मिळाले तर माणुसकीचे एक उत्तम उदाहरण आहे व या जगात अजुनही प्रमाणिक लोक आहेत.अशीच एक घटना घडली आहे.
महाराष्ट्र राज्यांचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या मौजे बाभळगाव ता. जि. लातूर येथे दिनांक.16 / 10 /2025 रोजी दुपारी 2. वाजता प्रथमेश टि हाऊस चे मालक श्री शैलेश (शालिक) नाडागुडे हे घराकडे जात असताना त्यांना त्यांच्या समोर रोडवर एक पाकीट दिसले व त्यामध्ये पाहिलं असता रोख रक्कम 5000/-हजार रुपये व एक व्यक्ती,एक महिला,दोन लहान मुलांचे मुळ आधार कार्ड, आभा कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व इतर ओरिजनल कागदपत्रे असलेले पाकिट त्यांना सापडले.त्या मध्ये कोणाचाही मोबाईल नंबर नसल्याने कोणालाही फोन पण लावता येत नव्हता. व आधार कार्ड वरील पत्ता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील असल्यामुळे काही संपर्क साधता येत नव्हता त्यामुळे बराच वेळ त्या ठिकाणी थांबले मागे किंवा पुढे कोणी गेले असेल त्याचे असावे परत कोणीतरी येईल असं त्यांना वाटले.बराच वेळ वाट पाहूनही कोणीही आलं नाही.परत ते हाँटेलमध्ये आल्यानंतर आपले मित्र शिवानंद गिफ्ट सेंटरचे मालक श्री महेश जाधव यांना सर्व घटना क्रम व हाकिकत सांगितले त्यांनी आधार कार्ड वरील नाव आयुब गफ्फूर शेख पत्ता सरडेवाडी ता. इंदापूर जि. पुणे असा पत्ता होता कोठेही कुणाचाही मोबाईल नंबर नसल्याने त्या व्यक्तीला संपर्क साधने अवघड झाले होते. त्या वेळी त्या दोघांनी आपल्या गावचे म्हणजे बाभळगावचे पोलीस पाटील श्री मुक्ताराम पिटले यांना सर्व घटना क्रम सांगितले व ते पाकीट ज्या व्यक्तीचे आहे त्यांना ते आपणास परत करायचे आहे असं सांगितले त्यांनी लगेच पुणे जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री भरत मारकड पाटील व इंदापूर तालुक्यात पोलीस पाटील संघटनेला संपर्क साधून इंदापूर तालुक्यातील श्री प्रदीप पौळ पाटील यांना संपर्क साधला त्यावेळी पोलीस पाटील यांनी सांगितले की आधार कार्ड वरील नावांचे गाव इंदापूर पासून जवळ आहे व त्या गावाचे पोलीस पाटील पद रिक्त आहे त्यामुळे त्या गावात पोलीस पाटील नाहीत तेथील सरपंच माझे मित्र आहेत.त्यांनी त्या गावच्या सरपंच यांचा मोबाईल नंबर संपर्क साधला. व त्यांना आधार कार्ड वरील व्यक्ती तुमच्या गावातील रहिवासी आहे का असं विचारलं त्या वेळी सरपंच यांनी तो व्यक्ती आमच्या गावातील रहिवासी आहे व तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे व तो अत्यंत गरिब कुटूंबातील आहे असं सांगितले आहे.व त्या व्यतीचा मोबाईल नंबर बाभळगावचे पोलीस पाटील मुक्ताराम पिटले यांना दिला.व त्या व्यक्तीस मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी लातूरला ट्रॅक्टर मालका सोबत आलो होतो व ट्रॅक्टर ची ट्रायल मारण्यासाठी लातूर -बाभळगाव - शिरूर अनंतपाळ असे जाणे- येणे केलो आहे. व मी लातूर पासून 40 किलोमीटर अंतरावर गेल्यावर मी पाणी बाँटल घेण्यासाठी पाकिट काढण्यासाठी पाहतो तर पाकिट पण नाही व पैसे पण नाहीत.ते पाकीट कुठे हरवल हे पण मला आठवत नव्हते ऐण दिवाळीच्या तोंडावर असताना पैसे हरवले खुप वाईट वाटतं होते व आता ते परत मिळणार नाही म्हणून मी सर्व आशा सोडली होती असं आयुब शेख यांनी मोबाईल वरून सांगितले* .*बाभळगावचे पोलीस पाटील श्री मुक्ताराम पिटले त्या व्यक्तीचे पाँकीट लातूर -पुणे बसमध्ये ड्रायव्हर जवळ देऊन इंदापूर येथील पोलीस स्टेशन इंदापूर येथे जमा करून पोलीस निरीक्षक श्री सुर्यकांत कोकणे साहेब यांच्या हस्ते श्री आयुब शेख यांच्या ताब्यात दिले या वेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भारत मारकड पाटील, पोलीस पाटील संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री सुनील राऊत पाटील, सुरेश देवकर पाटील यांच्या उपस्थितीत ते पैशाचे पाँकीट मिळाल्याबद्दल आयुब शेख यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून त्यांना आंनद अश्रू आले व माझी दिवाळी तुमच्या मुळे गोड झाली अशी भावना व्यक्त केली . या कृतीमुळे शैलेश नाडागुडे व मित्रांचे व पोलीस पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.*
*श्री शैलेश नाडागुडे यांच्या सारख्या माणसांमुळे आजही माणुसकी जिवंत आहे यांचे ताजे उदाहरण आहे.
टिप्पण्या