स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान व पतंजली योग समिती च्या संयुक्त विद्यमाने संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम धुमधडाक्यात
इंदापूर स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान व पतंजली योग समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरांमध्ये संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक व दोन नगरपालिके शेजारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी ओंकार साळुंखे बालगंधर्व पुरस्कार सन्मानित सर्व कलाकार स्वरवृंद ग्रुप यांनी सर्व कलाकारांनी पहाटेची भक्ती गीते भावगीते दिवाळी गीते या सुमधुर गीतांची मैफिल करत इंदापूरकरांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते त्यावेळी त्यांनी माझे सहकारी स्व. मंगेश पाटील यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम गेले चार वर्षे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करून शेखर पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजन करतात त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यापुढेही असेच कार्यक्रम जीवनामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा हा जपला पाहिजे असे उद्गगार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले या कार्यक्रमासाठी स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठानचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे पतंजली परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे मा. उपनगराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे मा. उपनगराध्यक्ष पै. पांडुरंग शिंदे इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अविनाश कोथमीरे संतोष देवकर रणजित चौधरी दीपक मगर अभिजीत पाटील नितीन मस्के निलेश शिंदे निलेश बोरा श्री सुहास नवगिरे श्री मोरे साहेब विकास बलदोटा पांडुरंग व्यवहारे गोपीचंद गलांडे भारत स्वाभिमान न्यास चे तालुका अध्यक्ष जयकुमार शिंदे पतंजली योग समिती तहसील अध्यक्ष श्री मल्हारी घाडगे तसेच योगसाधक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र परबत यांनी केले.
टिप्पण्या