सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर घरोघरी जाऊन भावांचे औक्षणकरून दिली मिठाई भेट.
प्रेम आणि विश्वासाचा सन आहे. ज्यांना बहिण किंवा भाऊ नाही. तेही हा सण उत्साहात साजरा करू शकतात.
दिवाळीतील महत्वाचा आणि भाऊ, बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणून भाऊबीजे कडे पाहीले जाते. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्या साठी.
सुखासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहीणीला भेट वस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. जवळच्या किंवा शेजारच्या व्यक्तीला भाऊ भाऊ मानून त्याला टिळा लावून.
औक्षण केले जाते. त्यामुळे मैत्रीचे नाते अधिक दृढ होते. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या भाऊबीज हा केवळ रक्ताच्या नात्या पुरता मर्यादित नसून. प्रेम विश्वास आणि संरक्षणाच्या भावनेतून जोडल्या गेलेल्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. असे सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर म्हणाल्या.
टिप्पण्या