मुख्य सामग्रीवर वगळा

पुण्यातील सर्व म्हणजे २८ जैन मंदिर विश्वस्त यांचा "आगाज २०२५" अंतर्गत सकल दिगंबर जैन समाज पुणे व पिंपरी चिंचवड तर्फे एच. एन. डी. जैन बोर्डिंग तसेच भगवान महावीर मंदिर वाचविण्यासाठी संघटित एल्गार, पुणे शहरात या कार्यक्रमाने घडविला इतिहास.

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
पुणे येथील एच. एन. डी. जैन बोर्डिंग तसेच बोर्डिंग मधील श्री. १००८ तीर्थंकर भगवान महावीर मंदिर हे दिगंबर जैन समाजातील पुणे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या युवकांची अस्मिता असून ही समाजाची संपत्ती आहे. त्यामुळे बोर्डिंग व मंदिर वाचविण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याचा ऐतिहासिक निर्णय श्री १०८ दिगंबर आचार्य गुप्तीनंदी महाराज व सहकारी साधूंच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी पुणे शहरातील सर्व म्हणजे २८ दिगंबर जैन मंदिरच्या विश्वस्तांनी संघटित एकत्रित येऊन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निर्णय घेतल्याने इतिहास घडला.
आगाज म्हणजे सुरुवात, शुभारंभ, मंगलाचरण होत आहे. या आरंभ साठी पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील २८ दिगंबर जैन मंदिर विश्वस्त यांनी एकत्र येऊन भगवान महावीर प्रतिपादीत जिनवाणी तसेच जगा व जगू द्या असा एकतेचा संदेश दिला. त्यामुळे हा दिवस दिगंबर जैन समाजामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाईल, असा आशीर्वाद आचार्य श्री १०८ गुप्तिनंदीजी महाराज यांनी दिला. 
सकल दिगंबर जैन समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पुणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व दिगंबर जैन मंदिर व त्यांच्या विश्वस्त कमिटी यांना एकत्र आणणारा हा आगाज कार्यक्रम पुणे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स वर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दीपप्रज्वलन अरविंद जैन, आशिष शहा, शितल दोशी, उदंग शहा, मिलिंद लगडे, अविनाश पाटील, पद्मकुमार अजमेरा, प्रीतम शहा यांच्या हस्ते संपन्न झाले.
 यावेळी सर्व दिगंबर जैन मंदिरांनी विविध नृत्य व नाटिकाचे सादरीकरण करत जैन संस्कृतीचा संदेश दिला.
यामध्ये माणिकबाग जैन मंदिर तर्फे "जैन धर्माचा प्रचार, सुसगाव जैन मंदिर तर्फे "जैनम् जयती शासनम्" या "जैन धर्म व जिन शासनाचा मार्ग", तर विमाननगर जैन मंदिर तर्फे "मंदिर एक संकल्पना, एक स्वप्न" या नृत्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत वाढली. यावेळी एलईडी स्क्रीनवर पुणे शहरातील सर्व दिगंबर जैन मंदिर यांची फोटो सहित माहिती दिगंबर जैन श्रावकांना दाखवण्यात आली.
एच.एन.डी. जैन बोर्डिंग व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर हे जैन समाजा द्वारे, जैन समाजासाठी बनवले गेले आहे. ते एका महान दाताराने दान केले असून ते वसतिगृह किंवा मंदिर तोडण्याचा किंवा विकण्याचा कोणालाही अधिकार नाही असे आवर्जून गुरु महाराज यांनी स्पष्ट केले. क्षमा वाणी दिवस हा "विश्व मैत्री दिवस" म्हणून गणला जात असून क्षमावाणी पूर्ण जगाला महाविनाशापासून वाचवणार आहे. जैनम जयतू शासनम या तत्वाप्रमाणे सर्वांनी एकमेकाला सहकार्य करून जैन धर्म व संस्कृती संवर्धित करावी असे आग्रही आवाहन आचार्य गुप्तीनंदी महाराज यांनी केले. 
यानिमित्त दिगंबर जैन समाजातील प्रतिभाशाली व्यक्ती, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न झाला. 
संध्याकाळी आबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले इंडियन आयडॉल फेम शिवम सिंग आणि त्यांच्या आर्केस्ट्रा बँड ची भक्ती संगीत संध्या व दांडिया नाईट संपन्न झाली.
यामध्ये वैष्णवी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. यानिमित्त जैन समाजातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच विक्री स्टॉलला देखील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन स्वप्निल पाटणी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीष जैन, महावीर शहा, सुरेंद्र गांधी, सुकमल जैन, सोनल जैन, ममता जैन, वीरेंद्र शहा, ॲड. शितल लोहाडे, सुजाता शहा, रितेश जैन, प्रीतम मेहता, महेंद्र गंगवाल, देवेंद्र बाकलीवाल, विनय चुडीवाल, प्रसून गोयल, शिल्पा शहा, क्षमा अजमेरा, प्रतिमा शहा तसेच सर्व दिगंबर जैन मंदिर चे विश्वस्त कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी रमेश वडुजकर, डॉ. श्रेणीक शहा, मिहीर गांधी, किरण शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...