इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षणही स्पष्ट झाले असून संभाव्य उमेदवार मतदार संघ आपल्याच वाट्याला या अपेक्षेने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रविण भैय्या माने यांचे खंदे समर्थक इंदापूर तालुका बाजार समितीचे माजी संचालक सरडेवाडी येथील राजाराम सागर यांनी थोपटले दंड आयात उमेदवारा विरोधात शंभर टक्के लढणारच. कार्यकर्ते, मित्र परिवार, मतदार बंधु भगिनी व आमचे नेते प्रविण भैय्या माने यांच्या पाठबळावर नक्कीच विजयश्री खेचून आणू असे राजाराम सागर म्हणाले.विविध गावात जलजीवन योजनाही अपूर्ण अवस्थेत असल्याने पाण्यासाठीही नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. यावर कोणताही पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.पण माळवाडी वडापुरी गटातून राजाराम सागर यांच्या नावाला जनतेतून पंसती दर्शविली जात आहे,
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या