लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया च्या वतीने अभिवादन -शिवाजीराव मखरे इंदापूर:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. आसल्याचे मत शिवाजीराव मखरे रिपब्लिकन चे पुणे जिल्हा संघटक यांनी इंदापूर येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर...
SHIVSRUSTHI NEWS