पोपटदादा ढोले आदर्श व्यक्तीमत्व - हर्षवर्धन पाटील
इंदापूर:
पोपट ढोले उर्फ दादा हे समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी मुलांना उच्चशिक्षित करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. दादांनी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून समाजाला धार्मिक संस्कार देण्याचेही काम केले आहे, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
लाखेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपट नाना ढोले (वय -81 वर्षे) यांच्या पार्थिवावर लाखेवाडी येथे मंगळवारी (दि.20) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पोपटदादा ढोले यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कार प्रसंगी आयोजित शोकसभेत हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पोपटदादांना शेतीची आवड होती. लाखेवाडी पंचक्रोशीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले तसेच ते पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आधारवड होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने तसेच पाटील कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी पोपटदादांचे चिरंजीव व मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले सर व ढोले कुटुंबीयांचे सांत्वन केले.
________________________________
टिप्पण्या