इंदापूर:-भाजपामध्ये प्रवेश केलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक श्री.भाऊसाहेब सपकळ स्वग्रही परतले,आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.दत्तात्रय (मामा) भरणे साहेबांच्या* प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
विधानसभेला भरणे मामांच्या विरोधात बंड करणाऱ्यांपैकी श्री.भाऊसाहेब सपकळ हे एक होते.परंतु आज पुन्हा एकदा माननीय भरणे मामांचे नेतृत्व मान्य करत त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले.
प्रवेश समारंभ प्रसंगी नामदार भरणे साहेबांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
दोन च दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील,संग्रामसिंह पाटील,कुलदिप पाटील,भोडणीचे प्रमुख नेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲड.संचित तानाजीराव हांगे यांनी प्रवेश केला होता,त्यानंतर पुन्हा एकदा आज माननीय भरणे मामांनी भाऊसाहेब सपकळांना प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची अजून जास्तीची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने जोरदार आगेकूच केली आहे.यावेळी बोलताना भाऊसाहेब सपकळ यांनी सांगितले की,विधानसभा निवडणुकीत थोड्याशा गैरसमजातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधुन बाहेर पडलो होतो.
परंतु या पुढे मात्र इंदापूर तालुक्याला माननीय भरणे मामा व राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही याची पुर्णपणे खात्री पटल्याने आम्ही सर्व सहकाऱ्यांसह माननीय भरणे मामांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून येथून पुढे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब,लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे व आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील,पंचायत समितीचे मा.सभापती प्रशांतबापू पाटील,कार्याध्यक्ष अतुल शेठ झगडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिनदादा सपकळ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर,बावड्याचे जेष्ठ नेते विजयराव घोगरे,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ,तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापूरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या