इंदापूरःवडापुरी (ता.इंदापूर, पुणे) येथील संपूर्ण महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त नंदीवाला समाजाचे आराध्य दैवत (कुलदैवत) अंबाजी- लिंबाजी देवस्थान आहे. गेली ३०० वर्षा पासूनची अंबाजी- लंबाजी देवस्थान यात्रेची व समाजाची परंपरा असून महाराष्ट्रभर हा नंदीवाला समाज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भटकत असतो.
गेली ३०० वर्षापासून इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात तीन वर्षातून एकदा हा नंदीवाला समाज एकत्रीत येत असतो. एक महिना वडापुरी गावात पाल (राहुटी) ठोकून आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या कुलदैवताच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातुन तसेच देशभरातून वडापुरी येथे नंदीवाला समाज एकत्रीत येत असतो. अनेक रूढी, परंपरा आपल्या पारंपारिक पद्धती जपत असतो. अनेक विचारांची देवाण-घेवाण, लग्नकार्य असे कार्यक्रम होत असतात.
या साठी गेली अनेक वर्षापासून वडापुरी गावातील १९ एकर जमीन अंबाजी -लिंबाजी देवस्थान व नंदीवाला समाज मागणी करत असून अनेक शासकीय कार्यालयात प्रस्ताव गायरान राखीव जागेचीसाठी सादर केले आहेत. वडापुरी ग्रामपंचायत पासून ते मंत्रालयापर्यंत कागदपत्राची देवाण-घेवाणं पत्रव्यवहार केला असून वडापुरी ग्रामपंचायतीने ठराव ,इंदापूर पंचायत समितीचे ठराव , जिल्हा परिषदेत ठराव असे अनेक प्रकारचे ठराव करून कागदपत्राची पूर्तता करून नंदीवाले समाजातील सामाजिक कार्यकर्ते व कार्यकर्त्यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारत राहिला आहे .या भटक्या समाजाला हेलपाटे घालायला लावण्यामागे नेमके जबाबदार कोण ?
इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावातील गायरान जमीन गट क्रमांक-७३९ (१)(अ) मधील ७.६० आर म्हणजेच १९ एकर जागेची मागणी करत आहेत. समाजातील कुलदैवताची यात्रेसाठी, सांस्कृतिक कार्यक्रम, आचार -विचाराची देवान-घेवाणं, सार्वजनिक सुविधा, सार्वजनिक प्रयोजन, धार्मिक कार्यक्रमासाठी, घरकुल निवास यासाठी या जागेचे आम्ही गेली अनेक वर्षे मागणी करत आहोत.
अनेक आमदार, खासदार , राज्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना निवेदन दिले आहेत .अनेकांनी आम्हाला प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली पण त्या आश्वासनाची आणि आमच्या मागणीची पूर्तता झाली नसून अंबाजी-लिंबाजी देवस्थानाची आणि समाजाची फसवणूक झाली आहे. जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा असाच लढा देणार असुन वेळप्रसंगी आम्ही न्यायालयीन लढा लढण्याची तयारीत आहोत. नंदीवाला समाजातील सामाजिक कार्यकर्ते दशरथ पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
----------------------------------------------------
चौकट : -
*अंबाजी- लिंबाजी देवस्थान तीनशे वर्षांची परंपरा*
अंबाजी- लिंबाजी देवस्थान इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावातील प्रसिद्ध देवस्थान असून नंदीवाला समाजाचे कुलदैवत आहे. गेली तीनशे वर्षापासून या समाजाची यात्रेची परंपरा असून या समाजातील कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना अनेक वेळा निवेदन दिले असून गेल्या पंचवार्षिक ला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आमदार असताना त्यांनी हा प्रश्न विधानसभेतही मांडला होता .महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा केला होता. तरीही कुठलाच ठोस निर्णय अंबाजी- लिंबाजी देवस्थान व नंदिवाला समाजासाठी झाला नाही. इंदापूर तालुक्यामध्ये नंदीवाला समाजाचे ५ हजार ७० च्या आसपास मतदान असुन महाराष्ट्रात १६ लाख नंदीवाला समाजीची मते लोकसभेला होत असतात. येणाऱ्या काळामध्ये या नंदीवाला समाजातील युवकांनी आणि समाजातील नागरिकांनी आणि समाजाने वेगळा निर्णय घेतल्यास चमत्कार घडू शकतो .आणि चमत्कार दाखवल्या शिवाय नमस्कार होत नाही अशी म्हणं आहे.
*दशरथ पवार*
(नंदीवाला समाजाचे या प्रश्नाचे पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते)
_________________________________
टिप्पण्या