इंदापूरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वामींचे ध्वजारोहण
इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज गुरुपौर्णिमेचे निमित्त साधत महतीनगर परिसरात असलेल्या दिंडोरी प्रणित श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र येथील श्री.स्वामी समर्थ महाराजांची आरती केली व सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वामी समर्थ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
योग गुरु दत्तात्रय अनपट यांचा जयकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' कोरोनाच्या संकटाचे लवकर निवारण व्हावे हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र एक अध्यात्मिक केंद्र झाले असून अध्यात्मिक व प्रसन्न वातावरण तयार झाले आहे.सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक विलास वाघमोडे, शिवाजी इजगुडे,हर्षवर्धन पाटील मोटार वाहतुक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, सुरेश मेहेर, मच्छिंद्र शेटे,प्रा. दत्तात्रय गोळे, दिलीप कोरटकर, आप्पा राऊत उपस्थित होते.
टिप्पण्या