इंदापूर:- शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये बाब्रस मळा येथे कन्हैय्या ट्रेडर्स ते निसर्ग प्लाझा ते दगडी विहीर या रस्त्यास मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी प्रदीपदादा गारटकर यांचे विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध करून दिला. सदर कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.प्रदीपदादा गारटकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. मधुकर (मामा) भरणे यांचे हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. कापरे साहेब, मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, मा. नगरसेवक श्रीधर बाब्रस, नगरसेवक अनिकेत वाघ, मा.नगरसेवक विनायक बाब्रस, मा. नगरसेवक राजेंद्र चौगुले, मा. नगरसेवक दादा सोनवणे, तशू सय्यद, वासिम बागवान इ. बहुसंख्येने उपस्थित होते.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या