इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री,मा.श्री. दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद व विकास कामांचा आढावा बैठक घेण्यात आली. जूना वॉर्ड क्रमांक ७ (प्रभाग क्र.५) मध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष मा.श्री. विठ्ठलराव ननवरे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, युवक शहराध्यक्ष इम्रानभाई शेख, युवक शहर कार्याध्यक्ष वसिमभाई बागवान, मा.श्री. साजन ढावरे मा.श्री. समदभाई सय्यद, सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुभाष मोरे व व्यंकटेशनगर भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर कार्याध्यक्ष मा.श्री. वसिमभाई बागवान यांनी केले होते,हा कार्यक्रम शोसल डिस्टंन्स ठेवून,सॅनिटायझर व मास्क चा वापर करून पार पडला.
टिप्पण्या