इंदापूर:-थाटामाटात गाण्याचे अनावरण अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न,उद्योग, व्यवसायानंतर आता युवक चित्रपटनिर्मिती व संगीत क्षेत्रातही गगनभरारी घेत आहेत. अनेक दर्जेदार लघुपटांची व संगीत निर्मितीही होत असून युवा कलाकारांनी 'हम किसी से कम नही' म्हणत अनेक पुरस्कारप्राप्त निर्मिती करत आहेत. देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. आपलं म्हणणं, आपला विचार शॉर्टफिल् व गाणीमधून प्रभावीपणे मांडून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यातही तरुणाई आघाडीवर आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी पुणे येथे "थाटामाटात" या गाण्याच्या अनावरण( लॉन्च) प्रसंगी काढले.
आदित्य सातपुते, विशाल फाले, मोहित सोमवंशी, हिंदवी पाटील व सानिका भोईटे यांनी आपल्या डोक्यातील कल्पना कॅमेऱ्यातून गाण्यामध्ये उतरवली आहे. “ थाटामाटात” च्या स्वरुपात मराठी प्रेक्षकांनसाठी उत्तम मनोरंजनाचे साधन उपलब्ध केले आहे. आज "थाटामाटात" हे गाण्याचे अनावरण पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
आदित्य सातपुते, विशाल फाले, मोहित सोमवंशी व सानिका भोईटे , हिंदवी पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अंकिता पाटील यांनी युवकांनी आपल्या कौशल्यातून पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून सोशल मीडिया स्टार युवक-युवती या लॉन्चिंगसाठी उपस्थित होते.
टिप्पण्या