*इंदापूर (ता.१८ ) प्रतिनिधी* :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रात एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांचे साहित्य हे उच्च कोटीचे होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अण्णांनी राजकीय प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्रात मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीसंग्राम या चळवळीत अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मोलाचे योगदान दिले. अण्णाभाऊंनी ही चळवळ जनमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे कार्याध्यक्ष ॲड. राहूल मखरे यांनी केले.
भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा ५२ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांनी अभिवादन केले.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे,संचालक गोरख तिकोटे , प्राचार्या अनिता साळवे ,मुख्याध्यापक साहेबराव पवार , सहशिक्षिका मनिषा जगताप, सहशिक्षक नानासाहेब सानप व अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेण्यात आली.
टिप्पण्या