इंदापूर:-राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून १ लाख .४० हजार रु चे अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष .मा.श्री सागरबाबा मिसाळ व इंदापूर चे तहसीलदार मा.श्री अनिल ठोंबरे सो यांनी दिली .यावेळी राष्ट्रीय कुंटुंब लाभ योजनेचे माहे जुलै २०२१ ला ७ प्रकरणे या योजनेची संपुर्ण कागद पत्रासहित कार्यालयांत प्राप्त झाली होती .७ लाभार्थी ना २० .००० रु प्रमाणे चेक मंजूर करण्यांत आले . आहे . ते पुढील प्रमाणे आहेत . १ . श्रीमती . काजल रविंद्र साबळे ( अंथुर्णे ) २ . श्रीमती . कस्तुरा शहाजी चव्हाण (लासुर्णे ) ३ श्रीमती . वैशाली अंकुश ढावरे . ( इंदापूर ) ४ . श्रीमती . अनुराधा रामचंद्र पवार ( कळंब ) ५ . कु .हर्षल हनुमंत कोकाटे ८ (सराटी ) ६ . श्रीमती . द्रोपदा रामचंद्र जाधव (काटी ) . ७ श्रीमती . कांचन रोहिदास कांबळे (रुई ) इंदापूर तालुक्यांतील सन २०१९ .२० .२१ या ३ वर्षाच्या काळांत सन २००२ ते २००७ च्या द्ररिद्य रेषेखाली कुटूंबांतील प्रमुख व्यक्ती मयत झाले असल्यांस त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी सर्वकागदपत्रे घेऊन इंदापूर नायब तहसिलदार सो प्रियंका वायकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मा .श्री सागर बाबा मिसाळ यांनी केले आहे जय हो ...
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या