मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिव सृष्टी न्युज

          इंदापूर:- मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन (हाय स्पीड रेल्वे) पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यातून जाणार आहे. या बुलेट ट्रेन साठी जमिन संपादित करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, बागायती शेतीचे नुकसान होऊ नये असा रेल्वे मार्ग निवडावा, संपादित जमिनीला चांगला मोबदला देण्यात यावा, असे निवेदन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे सोमवारी (दि.26) दिले व यावेळी त्यांचेशी सविस्तरपणे चर्चाही केली. याप्रसंगी माढ्याचे  खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.समाधान आवताडे, राज्य साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपस्थित होते. दरम्यान,बागायती शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा बुलेट ट्रेनचा मार्ग असेल, संपादित जमिनीस  समाधानकारक मोबदला दिला जाईल तसेच रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा बैठक घेऊ, अशी ग्वाही यावेळी  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिष्टमंडळास दिली. 
                   केंद्र सरकारचा मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग जाणाऱ्या इंदापूर, माळशिरस, पंढरपूर,  मंगळवेढा आदी तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. इंदापूर तालुक्यातूनही हा रेल्वे मार्ग जाणार आहे. इंदापूर तालुक्यात एकूण 4 प्रस्तावित मार्गाचे रेल्वेने सर्वेक्षण केले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
        बुलेट ट्रेन प्रकल्प देशहीताचा असल्याने व स्थानिक परिसराचा विकास होणार असल्याने बुलेट ट्रेनला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र बुलेट ट्रेन मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शक्यतो जिराईत जमिनीचा विचार व्हावा, संपादित जमिनीला अतिशय चांगला मोबदला मिळावा, संपादित जमिनीच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रेल्वे नोकरीत प्राधान्य व इतर लाभ मिळावेत, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री  दानवे यांच्याकडे केल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपण एकमेकांशी संपर्कात राहू, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात ग्वाही दिल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...