इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे,उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा,दादाअसे नाव आहे ज्या नावाची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये नेहमी होतच राहते, तसेच विरोधकांना धडकी भरवणारे नेतृत्व गुण आसणारे दादा,..... कार्यकर्त्यांना खंबीर साथ देऊन, लढ म्हणून सांगणारे नेते,
त्यांनी महाराष्ट्रा मध्ये विकास कामे करून कायापालट केला आहे. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोठे नेते असुन शरदचंद्र पवार साहेब यांचे पुतणे आहेत.
दादांचा यांचा जन्म देवळाली प्रवरा (ता.राहुरी जि.अहमदनगर) या त्यांच्या गावी झाला, महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्यांनी मुंबई गाठली. शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत बारामती येथे जाऊन सहकारी संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरूवात केली.अजितदादा पवार यांचे आजोबा बारामती येथे व्यापार करीत असत तर आजी शेती करायची. अजित पवारांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने शिक्षण सोडुन ते पुन्हा बारामतीला आले आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
१८८२ साली सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर ज्यावेळी ते निवडुन आले तेव्हां त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१० ते २०१४ या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन देखील जवाबदारी त्यांनी सांभाळली होती,आणी आज २०२१ रोजीही तोच दबदबा, त्याच रूबाबात,आज दादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत, आजून आपली आशीच प्रगती होत राहोत, हीच या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छां....!
**************************************
टिप्पण्या