इंदापूर:-द टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपमार्फत विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या कर्तृत्व व योगदानाचा सन्मान करण्यासाठी 'टाइम्स सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व ' हा सन्मान प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा सामाजिक क्षेत्रातील टाइम्स सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व 2021 पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांना सिने-अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अत्यंत कमी वयामध्ये राजकारणात पदार्पण करत तेही उच्च शिक्षण घेऊन त्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यान्वित आहेत. कोविडच्या काळामध्ये घरात न बसता नागरिक हे कसे सुरक्षित राहतील यासाठी त्या दिवस रात्र राबत होत्या. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळत नव्हते त्यावेळेस रात्रंदिवस त्या नागरिकांना मदत करत होत्या. अंकिता पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत द टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपमार्फत कु.अंकिता पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या