इंदापूर:-31 /7 /2021 रोजी श्री धन्यकुमार गोडसे सो पोलीस निरीक्षक इंदापूर पोलिस स्टेशन व श्री अनिल ठोंबरे सो तहसीलदार इंदापूर यांचे संयुक्त कारवाईने उजनी जलाशयामध्ये यांत्रिकी बोटी द्वारे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत ,या कारवाईमध्ये एकूण 40 लाख रुपये किमतीच्या वाळू उपसा करणारे यांत्रिकी बोटी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत.
-----‐------------------------------------------------------
सदर कारवाईमध्ये मा. श्री धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलिस स्टेशन,श्री अनिल ठोंबरे साहेब तहसीलदार इंदापूर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने ,पोलीस शिपाई अमोल गारुडी, समाधान केसकर ,राजू नवले, अर्जुन भालसिंग,पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे ,संजय राऊत ,महसूल विभागाचे तलाठी यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला असून वाळू माफियांवर धडक कारवाई चालू असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत,आशी माहीती पो.नि.धन्यकुमार गोडसे यांनी दिली,
टिप्पण्या