इंदापूरः- शहरातील धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने *लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथीनिमित्त* त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा.प्रदिपदादा गारटकर यांनी श्रीराम चौक येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,या वेळी,
मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, मा. नगरसेवक श्रीधर बाब्रस, आण्णा ढावरे, दादा सोनवणे, अनिल चव्हाण, किरण गायकवाड, मनोज भापकर, रमेश बनसोडे, सुनिल दुधनकर, गणेश गोरे, बाळू अडसूळ, प्रशांत सिताप, ललेंद्र शिंदे, चंदू सोनवणे, तशू सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.या वेळी,श्रीधर बाब्रस म्हणाले की,
आण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न ,आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. आसेही श्रीधर बाब्रस म्हणाले, या वेळेस बोलताना विठ्ठलराव ननवरे म्हणाले की,
मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.आसे ननवरे म्हणाले, हा कार्यक्रम शोसल डिस्टंन्स ठेवून व मास्क व सॅनिटायझरचा वापर करून पार पाडला,
टिप्पण्या