इंदापूर:- शुक्रवार(दि१६)रोजी इयत्ता दहावीचा जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालानुसार जंक्शन (ता.इंदापूर) येथील सदाशिवराव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला असून शेळगाव(ता.इंदापूर)येथील पत्रकार संतोष ननवरे यांची कन्या सानिया संतोष ननवरे हिने ९४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविले आहे.अशी माहिती विद्यालयाचे अध्यक्ष वसंत मोहोळकर व प्राचार्य चंद्रकांत सोळसे यांनी दिली आहे.
मार्च २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेस नंदिकेश्वर विद्यालयातुन १०९ विद्यार्थी बसले ते सर्व १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००टक्के लागला असून या मध्ये शेळगाव येथील तिन्ही जीवलग मैत्रीण असलेल्या सानिया संतोष ननवरे हिने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर प्रांजली आप्पासो बनसोडे हिने ९१.८० टक्के गुण मिळवत व्दितीय तर साक्षी कुशाबा बनसोडे हिने ९१.२० टक्के गुण मिळवून तृतीया क्रमांक मिळवित दोन बहिणीनी व्दितीय व तृतीया क्रमांकावर यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थचे अध्यक्ष वसंत मोहोळकर,सचिव रोहित मोहोळकर,प्राचार्य चंद्रकांत सोळसे,संजय मोहोळकर,ऋषीकेश मोहोळकर यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या