इंदापूर :-तालुक्यातील पडस्थळ येथील रेडके कुटुंबियांनी कृषी सेवा क्षेत्रात केलेले पदार्पण कौतुकास्पद आहे. कृषी सेवा क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे, त्यामुळे या क्षेत्रात संधी असल्याने रेडके कुटुंबीय निश्चितपणे नाव कमावतील, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.25) काढले.
निमगाव- केतकी येथे रेडके अँग्रो मार्टचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संप्पन्न झाले. याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी महेंद्रदादा रेडके व कृषी पदवीधर असलेले नारायण (काका ) रेडके व रेडके कुटुंबीयांना कृषी सेवा व्यवसायात पदार्पण केलेबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
देशात व संपूर्ण जगामध्ये कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास चालु आहे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी व्यवसायामध्ये होत आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना रासायनिक खतांसाठी वर्षाला 84 हजार कोटी रुपये अनुदान देत होते, त्यात नुकतीच आणखी 14 हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकार कृषी क्षेत्रात प्रोत्साहन देत आहे. इंदापूर तालुका हा गेली 60 वर्षांपासून राज्यामध्ये कृषी क्षेत्रात प्रगतीपथावर आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
पडस्थळचे रेडके कुटुंबीय जिद्दी, प्रामाणिक सचोटीने काम करणारे आहे. रेडके अँग्रो मार्ट मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच सर्व सुविधा उपलब्ध होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितले. प्रारंभी हर्षवर्धन पाटील यांचे महेंद्र रेडके व नारायण रेडके यांनी स्वागत केले. कार्यक्रमास तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________
टिप्पण्या