इंदापूर : साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षपूर्ती व यंदा होणाऱ्या १०१ व्या जयंतीनिमित्त बहुजन परिषद, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
दरम्यान कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बिभीषण लोखंडे पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शासकीय स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी विभागातील कर्मचारी, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत मंडळ सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांचे सचिव, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर या व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते व पत्रकार यांनी कोरोनाच्या कालखंडात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या माणुसकीचे दर्शन घडवून आपापल्या परीने जबाबदारी स्विकारुन वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली, सेवा केली तसेच धीर दिला. त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण केली. अशा १०१ जणांच्या कार्याचा गौरव दि. १५ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
यावेळी बहुजन परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर, सरचिटणीस विजय गायकवाड, खजिनदार भगवान पासगे, संजय कुचेकर, सुनिल आरडे, राजू गायकवाड, बिजू मिसाळ, आझाद मुलाणी, परिषदेचे कायदेशीर सल्लागार अॅड. नारायण ढावरे, प्रसिद्धीप्रमुख दिपक खिलारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे संजय राऊत, लक्ष्मण शिंदे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते
टिप्पण्या