इंदापूर:-शनिवार दिनांक 24.7.2021 रोजी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने रमाई आवास(घरकुल) योजनेअंतर्गत एकूण 94 घरकुले मंजूर झाली आहेत. त्यांपैकी प्रथम आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेल्या व या योजनेत लाभार्थी असलेल्या सविता उत्तम मखरे व हनुमंत मरीबा मखरे यांचे घरकुलाचे भूमिपूजन मा. नगराध्यक्ष सौ.अंकिता मुकुंद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगरसेविका सौ.राजश्री अशोक मखरे, मा. श्री मुकुंद शेठ शहा सचिव, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ , अॕड.श्री राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी या मान्यवरांच्या हस्ते झाले याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक व रमाई आवास योजने चे काम पाहणारे श्री भागवत मखरे,अॕड.श्री किरण लोंढे, प्राध्यापक श्री मयूर मखरे,अॕड.श्री सुरज मखरे, श्री दर्या राज मखरे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
SHIVSRUSTHI NEWS
टिप्पण्या