इंदापुरः- येथे सागा फिल्म फाऊंडेशन च्या वतीने सामाजिक सेवेबद्दल दिला जाणारा पुरस्कार व कोविड काळात केलेल्या सेवेबद्दल कोवीड योद्धा सन्मान पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी याचें मोठे बंधु प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते नानासाहेब खरात व सौ.अनिताताई नानासाहेब खरात यांना प्रदान करण्यात आला. तेजप्रुथ्वी ग्रुप च्या माध्यमातून खरात कुटुंब नेहमी सामाजिक कार्यात आग्रेसर असते या जाणिवेतून सागा फाऊंडेशन च्या वतीने,सागर धापटे व महेंद्र दादा रेडके यांनी पचांयत समिती येथील अल्प बचत सभागृहात मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रल्हाद मोदी व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर मान्यवराच्यां ऊपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला,सन्मान सोहळ्या नतंर
हेल्थ केयर मेडिकल इंदापूर येथे तेजप्रुथ्वी ग्रुपच्या सदस्यांनी सौ.अनिताताई खरात व नानासाहेब खरात याचां सत्कार केला त्यावेळी बोलताना नानासाहेब खरात म्हणाले की हा सन्मान माझा एकट्याचा नसुन सर्व तेजप्रुथ्वी ग्रुपच्या सदस्यांनी कोविड काळात गोरगरीब लोकांना केलेल्या मदतीची पावती आहे आणि या पुरस्कारामुळे तेजप्रुथ्वी ग्रुप येथुन पुढे महेंद्र दादांच्या मार्गदर्शनाखाली आणखी वेगाने काम करेल .तेजप्रुथ्वी ग्रुप नेहमीच गोरगरीब दुर्लक्षित लोकांच्या मदतीला धावुन जातो .आजच्या पुरस्काराबद्दल तेजप्रुथ्वी ग्रुप चे सर्व सदस्य आनंदी होते या वेळेस तेजप्रुथ्वी ग्रुपचे गणेशभाऊ शिगांडे,रूपेश वाघमोडे, प्रसाद पाध्ये हनुमंत यमगर,सतोंष कुंभार , दिलीप कुंभार, सपंत पुणेकर, अशोक गायकवाड,रफिक मुलाणी ,महेश शिंदे व ईतर सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या