इंदापुरः- लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त इंदापुर मधील श्रीराम चौक येथील लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे नगर मध्ये प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले...
श्रीराम चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष मा.श्री. प्रदीपदादा गारटकर यांनी पुष्पहार अर्पण केला तर लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे नगर येथे इंदापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा सौ.अंकिताताई शहा व प्रभागाच्या नगरसेविका सौ.राजश्रीताई अशोक मखरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. विठ्ठल आप्पा ननवरे, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, इंदापुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री.बाळासाहेब ढवळे. माजी नगरसेवक, दादासाहेब सोनवणे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा. सुधीरशेठ मखरे, माजी नगरसेवक, प्रशांत शिताप, सामाजिक कार्यकर्ते, दिलीपराव शिंदे, अनिल बाबा ढावरे, ललेंद्र शिंदे, चंद्रकांत सोनवणे, बाळासाहेब आडसुळ, नंदू खंडाळे, उमेश ढावरे, संजय सानप, नाथा ढावरे, महादेव लोखंडे, विकास खिलारे, वसिम बागवान, अहम्मदरज्जा सय्यद, ज्ञानेश्वर सोनवणे, बापू आडसुळ, किरण खंडाळे (पोलीस पाटील), राजु शिंदे, सोनू ढावरे, विलास सोनवणे, भिमा आडसुळ, अजय सोनवणे, इत्यादी मान्यंवर उपस्थित होते.
टिप्पण्या