बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक:- वसिमभाई शेख
इंदापूर:- काही दिवसा पूर्वी स्टँम्प घोटाळ्याने भारत हादरला होता, तो तेलगी.... आणी आता इंदापूर तालुक्यातील अनेक घोटाळे याला काय म्हणावे....रामजाने,
इंदापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार होत असताना स्टॅम्प व्हेंडर बाळासाहेब शिंदे व त्यांचा मुलगा प्रदीप शिंदे यांनी दुय्यम निबंधकांच्या बरोबर संगणमत करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वशिम नजीर शेख यांनी केला आहे.
सातबारा व उताऱ्यावरती बनावट नावे टाकून तलाठ्यांच्या बनावट सह्या दस्तावरती करून व बनावट शिक्के बनवून त्याचा वापर करून सदर बनावट सातबाराच्या आधारे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात आहेत असाही आरोप वशिम शेख यांनी केला आहे.
विस्तृत स्वरूपात पुराव्यानिशी उदाहरण देत असताना वशिम शेख म्हणाले की इंदापूर येथील जमीन गट क्र:- २२१ / २/ अ मधील मूळ सातबारा उतारा मध्ये रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांच्या नावावरती कोणत्याही प्रकारचे क्षेत्र नसताना खरेदी वेळी सदर सातबारावरती रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांचे बनावट नाव सामाविष्ट करुन त्यांच्या नावावर ती या क्षेत्रातील २ गुंठे जागा दाखविण्यात आली आहे.
तसेच त्या बनावट उताऱ्याच्या आधारे खरेदी खत तयार करण्यात आले आहे.आपण सदर गट क्रमांकाचा सातबारा उतारा सद्यस्थितीला पाहिले असता हे सर्व अनागोंदी कारभार आपणाला पहावयास मिळत आहे आणि याला जबाबदार सदर खरेदी खत केलेली व्यक्ती व दुय्यम निबंधक हे असून यांनीच संगनमताने डुबलीकेट खरेदी खत तयार केले आहे असा गौप्यस्फोट वशिम शेख यांनी केला आहे.
पुढे शेख म्हणाले की प्रदिप बाळासाहेब शिंदे हा व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन तेथील कॉम्प्युटर वरती छेडछाड करून बनावट दस्तऐवज बनवण्याचं काम करत आहे. त्याला सदर ठिकाणी बसण्यास परवानगी कोणी दिली याचाही शोध घेणे महत्वाचे आहे.
तसेच प्रदीप बाळासाहेब शिंदे या व्यक्तीने स्वतः तयार केलेल्या बनावट दस्तऐवजा वरती व इतर दस्तऐवजा वरती राज्य निबंधक विभागाचा लोगो छापण्याचा अधिकार कसा मिळविला व तो कोणत्या नियमानुसार छापला याची माहिती मिळणे आवश्यक आहे.
पुढे शेख म्हणाले की आपण दुसरा भोंगळ कारभार पाहिल्यास प्रदीप शिंदे व बाळासाहेब शिंदे यांच्या बँक खात्यावरून अनेक व्यवहारांची स्टॅम्प ड्युटी दुय्यम निबंधक कार्यालयात जमा करण्यात आली आहे. तसेच दुय्यम निबंधक यांच्याकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मी अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार करूनही त्यांनी ज्या लोकांनी शासनाची फसवणुक केली आहे त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही तसेच असा गंभीर गुन्हा करूनही त्यांच्यावरती कारवाई केली गेली नाही.
त्यामुळेच स्टॅम्प व्हेंडर बाळासाहेब शिंदे व त्यांचा मुलगा प्रदीप शिंदे तसेच दुय्यम निबंधक इंदापूर यांच्यावरती शासनाच्या फसवणुकीचे कठोर गुन्हे दाखल करावेत यासाठी दि.२१/०७/२०२१ रोजी मी धरणे आंदोलन करणार आहे असे वसीम शेख म्हणाले.
बनावट दस्ताचे प्रकरण न्यायालयात जाणार….?
जर या प्रकरणी सबंधित ज्या व्यक्तींनी शासनाची फसवणूक करून करोडो रूपयांचा महसूल बुडविणार्या व्यक्तींवरती कारवाई न झाल्यास याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शासनाची फसवणूक झाल्याचे पुरावे न्यायालयात सादर करू असे वासिम शेख म्हणाले…
चौकशी करून कारवाई करू;- दुय्यम निबंधक
दुय्यम निबंधक यांना माहिती विचारले असता ते म्हणाले की दस्त संबंधी सर्व व्यक्तींना नोटीस काढण्यात येतील व संबंधित तलाठ्याकडे या विषयी माहिती मागवुन कलम ८२ नुसार कारवाई करण्यात येईल.
टिप्पण्या