मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

 
 इंदापूरः- तालुक्यातील गुलाबनगर ( रेडा) गावातील प्रसिद्ध संत गुलाबबाबा मंदिर असून तिथून संत गुलाबबाबा पालखी सोहळा पायीवारी पालखी सोहळा निघत असतो.(दि.१४ )रोजी सालाबादप्रमाणे विधिवत पूजा करून पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झाला. यावेळी संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव देवकर आमच्याशी बोलताना म्हणाले की ,संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे पालखी  सोळावे (१६)वर्षे असून कोरोनाच्या  पादुर्भावामुळे हा पालखी सोहळा साध्या पद्धतीने सालाबादप्रमाणे प्रस्थान करत असून संत गुलाबबाबा मंदिरामध्ये पालखी सोहळा पाच दिवस मुक्काम करणार असून रोजच्यारोज प्रवचन ,भजन मोजक्या वारकरी मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून विविध रोजच्यारोज पूजा होणार आहे.
 आषाढी एकादशी दिवशी संत गुलाबबाबा यांच्या पादुका नीरा नरसिंहपूर संगमावरती चंद्रभागेचा जिथून उगम झाला तिथे स्नान करून परत मंदिरामध्ये आणल्या जातील आणि गोपाळकाल्याचे किर्तन मोजक्याच वारकरी मंडळी झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होईल असे त्यांनी पालखीसोहळ्या बाबत माहिती दिली . यावेळी रेडा गावचे सरपंच सौ.सुनिता देवकर ,युवा नेते नानासाहेब देवकर ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार, धनंजय गायकवाड, संत गुलाबबाबा संस्थानचे सचिव तुकाराम जगदाळे बोलताना म्हणाले की, आज संत गुलाबबाबा पालखी सोहळा प्रस्थान होत असतो, संतराज पालखी सोहळा गुलाबनगर (रेडा) गावात आगमन होत असते. दोन्ही पालखी सोहळ्याच्या वारकरी मंडळीने गुलाबनगर (रेडा) गजबजून जाते.  प्रत्येक जण आपापल्या घरी वारकरी भोजनासाठी घेऊन जात असतो .आपापल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करत असतो. पण कोरोनामुळे हा आनंद  गेली दोन वर्षे घेता येत नाही त्याची आम्हाला भाविकांना खंत वाटते.महिला मंडळ  बोलताना म्हणाल्या की, आम्ही वर्षभर संत गुलाबबाबा पालखी सोहळा व संतराज पालखी सोहळ्याची वाट पाहत असतो .घरापुढे रांगोळ्या काढून, घरामध्ये सजावट करून वारकऱ्यांना भोजन   सेवा, रिंगण असा सांप्रदायिक कार्यक्रमची वाट पाहत असतो .पण  कोरोनामुळे आनंद आज आम्हाला लुटता येत नाही तरी ही साध्या पद्धतीने का होईना हा सोहळा संपन्न झाला याचा आनंद आहे. यावेळी पालखी सोहळ्याचे मानाचे अश्‍व सराफवाडी  येथील भागवत धायगुडे, चोपदार ,विणकरी, तुळशी वृंदावनचे मानकरी उपस्थित होते. कोरोनाचे जगावर मोठे संकट ओढवले आहे आणि त्यामुळे गेली दोन वर्षे पंढरपूर येथे वारी किंवा पालखी सोहळा शासनाच्या निर्बंधांमुळे होत नाही.  मानाच्या मोजक्याच  पालख्यांना शासनाने मान्यता दिल्यामुळे इतर पालखी सोहळे व दिंड्या आपापल्या गावातच साध्या पद्धतीने पालखी प्रस्थान प्रस्तान करून विधिवत पूजा करत आहेत असे पहावयास मिळत आहे. 

संत गुलाबबाबा कर्मभूमी काटेल धाम व जन्मभूमी टाकरखेड मोरे येथून काटेल धाम संस्थान अध्यक्ष सोनूमामा भाटिया, सचिव डॉ. पुरुषोत्तम दातकर सर्व विश्वस्त मंडळ, आणि टाकरखेड येथील संत गुलाबबाबाचे वंशज ज्ञानेश्वरभाऊ उमक, गोपाल उमक सर्व विश्वस्त मंडळ  , पुणे, सोलापुर, नंदुबार, नागपुर, सागर(म.प्र), रायपुर, औरगांबाद, मुंबई, अलिबाग येथील भक्तांनी दूरध्वनीवरून पालखीसोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

 संत गुलाबबाबांचे भक्त हे महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक राज्यातून आणि जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातील संत गुलाबबाबा पालखी सोहळ्यास भक्त मंडळी येत असतात. उद्योजक ,व्यावसायिक, व्यापारी यांचीही मोठी उपस्थित असते. या कार्यक्रमासाठी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष  अँड.तानाजीराव बाबुराव देवकर, सरपंच सौ. सुनीता देवकर , सचिव तुकाराम जगदाळे ,माजी सरपंच तुकाराम देवकर  नानासाहेब देवकर, अँड .योगेश देवकर, संतोष  देवकर , शेटफळ हवेलीचे संत गुलाबबाबा भक्त मंडळ , रत्नदिप शिंदे ,उमेश पाटील,दिलीप देवकर, आदिनाथ देवकर ,बापु शिंदे, किसन देवकर,  ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार,धनंजय गायकवाड, हरीचंद्र देवकर ,चोपदार ज्ञानदेव गोळे,  बाळासाहेब कुंभार ,गणपत शिंदे ,अशोक मोहिते महाराज ,बापु गुरव, गणपत जाधव ,जनार्दन गोसावी, ज्ञानदेव पवार, काशिनाथ देवकर, रेडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गणेश खारमाटे,  कर्मचारी गणेश वाघ, महिला मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 संत गुला बाबा सोळहा रेडागावातुन प्रस्थान होऊन पहिल्या दिवशी मारुती मंदीरातच मुक्काम असतो. त्याच दिवशी संतराज पालखी सोहळा हि रेडागाव मध्ये आगमन असते, दोन्ही पालख्यांचा  प्रितीसंगम पाहण्याजोगा असतो. (दि.१५) पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होते.  त्यानंतर संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम बावडा येथील बागल फाटा तिसरा मुक्काम दत्त मंदीर मायनर  (श्रीपूर) , चौथा बंडीशेगाव (कोळयाचा मळा ) ,पाचवा वाखरी(पंढरपूर) , दोन दिवस पालखी सोहळा पंढरपूर मध्ये मुक्काम करून आषाढी एकादशी करुन गोपाल काल्याचे किर्तन होताच परतीचा प्रवास सुरू होतो. नामवंत  कीर्तनकारांचे कीर्तन,  प्रवचन, भजन, भारुड अनेक कार्यक्रम होत असतात. डॉक्टर मंडळी ही रुग्णांची सेवा करत असतात. आपली सेवा देत असतात. अनेक भक्त भोजनाच्या पंगती, नाष्टा चहापाणी अशी ही व्यवस्था करत असतात. हा सोहळा गेली दोन वर्ष कोरानामुळे  साधेपणाने  होत आहे . प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं आणि लोकांनी त्याचा आनंदही लुटला . कोरोनाचे नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने श्री संत गुलाबबाबा पालखी प्रस्थान झाले आणि  टाळ-मृदुंग, ज्ञानोबा - तुकाराम ,गोपाला गोपाला च्या नाम घोषाने अवघे वातावरण गुलाबमय झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...